सक्तीच्या वीज बील वसुली विरोधात भारतीय जनता पार्टीचे : ३ डिसेंबर रोजी महावितरण कार्यालयासमोर चक्काजाम
उस्मानाबाद :- असंवेदनशीलतेची परिसीमा ओलांडलेल्या महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करत कृषी पंपाची वीज पुरवठा खंडित करू नये, खंडित केलेल्या शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करावी या मागणीसाठी दि. ०३.१२.२०२१ रोजी उस्मानाबाद शहरातील अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष, श्री. नितीन काळे यांनी दिली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी वारंवार येत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड अडचणीत आला आहे. खरीपाची पिके पाण्यात वाहून गेल्यानंतर रब्बीची पिके तरी हाती लागतील या आशेपोटी असलेल्या शेतकऱ्यांवर वीज पुरवठा खंडित करून फार मोठा अन्याय महाविकास आघाडी करत आहे. खाजगी सावकारापेक्षा जास्त वसुलीचा तगादा मायबाप सरकारकडूनच केला जात असताना नेमकी दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न बळीराजाला पडला आहे.
खरीपातील नुकसानीपोटी महाविकास आघाडी सरकार कडून दिलेल्या शब्द न गेला नाही. एकही शेतकऱ्याला हे. १० हजार अनुदान मिळाले नाही. जे तुटपुंजे अनुदान दिले तेही पूर्ण वितरीत करण्यात आलेले नाही. अशामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेठीस पकडून ऐन रब्बी हंगामात वीज तोडणी करत महावितरणच्या माध्यमातून राज्य सरकारने अन्यायकारक वसुली मोहीम सुरु केली आहे हे थांबवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दि.१७.११.२०२१ रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर दोन मंत्रीमंडळाच्या बैठका होवून देखील या गंभीर विषयाबाबत कुठलेच सकारत्मक पाउल उचलण्यात आले नाही.
महावितरणचे अधिकारी हतबलता व्यक्त करत असले तरी वीज तोडणीचे प्रत्यक्ष काम तेच करीत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध करत कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांची वीज जोडणी पूर्ववत करण्यासाठी दि. ०३.१२.२०२१ रोजी स. ११.०० वा. उस्मानाबाद शहरातील अधीक्षक अभियंता, महावितरण यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवाना व नागरिकांना या रास्त मागणीसाठी आंदोलनात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सदरील आंदोलनाबाबत जिल्हयाचे नेते प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद जिल्हयाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी नेताजी पाटील, विक्रम मालक देशमुख, राजाभाऊ पाटील, संतोषदादा बोबडे, राजसिंह राजेनिंबाळकर, विजय शिंगाडे, रामदास कोळगे, निहाल काझी, नामदेव नायकल, दत्तात्रय सोनटक्के, राहुल काकडे, अभय इंगळे, अजित पिंगळे, अरुण चौधरी, यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.