उस्मानाबाद जिल्ह्यात 'NO VACCINE NO ENTRY' - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
उस्मानाबाद :- जिल्हयातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालांमध्ये ' NO VACCINE NO ENTRY " मोहिम राबविणेबाबत जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज 1 डिसेंबर 2021 रोजी आदेश जारी केला आहे.
तसेच शासकीय , निमशासकीय व खाजगी ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना देखील कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काही दिवसापूर्वीच जारी केले आहेत व त्या संबंधित कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक देखील केली आहे. तसेच सर्वांनी व्हॅक्सिनेशन लवकरात लवकर करून घ्यावे यासाठी देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी आवाहान करण्यात आले आहे नागरिकांनी लवकरात लवकर जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करून घ्यावे असे आवाहन देखील वेळोवेळी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.