औरंगाबादेत ओमायक्रॉनचे २ रुग्ण आढळले राज्यातील एकूण संख्या ११० वर ; १४८५ कोरोनाबाधितही वाढले
मुंबई : देशभरासह राज्यात चिंता वाढवणाऱ्या ओमायक्रॉनने आता औरंगाबाद जिल्ह्यातही शिरकाव केला आहे . औरंगाबादेत आज दोन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहे . यामुळे आता राज्यातील एकूण ओमायक्रॉनग्रस्तांची संख्या ११० वर गेली आहे . औरंगाबादेत इंग्लंड आणि दुबईहून आलेल्या दोन व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला होता . त्यामुळे त्यांच्या स्वॅबचे नमूने पुण्यातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबकडे पाठवण्यात आले होते .
आज आलेल्या अहवालात या दोन्ही व्यक्तींचा ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे .
राज्यात कोरोनाचे १४८५ नवे रुग्ण
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे . आज दिवसभरात १,४८५ नवे रुग्ण आढळून आले आहेत . तर ७,९९६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे . दरम्यान , १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे . दरम्यान , राज्यात सध्या ९,१०२ सक्रिय रुग्ण आहेत . अशी माहिती दैनिक बंधुप्रेम ( सोलापूर ) वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे.