कराळी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, प्रदेश कॉंग्रेस समितीचे सचिव दिलीप भालेराव, भन्ते सुमंगल, आनंतकुमार कांबळे यांनी बौद्ध धम्म परिषदेच्या तयारीची पाहणी केली
उस्मानाबाद/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील कराळीच्या कपिल वस्तु बौद्ध विहार परिसरात दिडशे बाय दिडशे फूट अंतराचा भव्य मंडप उभारण्यात येत आहे. उपस्थित नागरिकांना भोजनासाठी . स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, प्रदेश कॉंग्रेस समितीचे सचिव दिलीप भालेराव भन्ते सुमंगल, कराळी ग्रामपंचायतीचे सदस्य आनंतकुमार कांबळे यांनी मंगळवारी दि.28 डिसेंबर रोजी सांयकाळी तयारी पाहणी केली.
-----------------------------------------------------------------------
बौद्ध धम्म परिषदेची जय्यत तयारी
कराळीच्या कपिल वस्तु विहार परिसरात शुक्रवारी होणार परिषद ; माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, राज्यमंत्री संजय बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती
----------------------------------------------------------------------- कराळी येथील दि लॉर्ड बुद्धा रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्टच्या कपिल वस्तू परिसरात शुक्रवारी दि.31डिसेंबर रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
धम्म परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या परिषदेस बौद्ध भिक्षु उपगुप्त महाथेरो, डॉ. सुमेधबोधी महाथेरो, भन्ते सुमेध नागसेन, भन्ते सुमंगल, भन्ते डी. धम्मसार आदींची धम्म देसना होणार आहे.
सकाळी साडे दहा वाजता धम्म ध्वजारोहन आणि बुद्ध मूर्तीच्या पूजना नंतर महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कडूबाई खरात यांच्या भिम गीताचा कार्यक्रम होणार आहे. दरम्यान या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, कळंबचे माजी आमदार दयानंद गायकवाड, महात्मा फुले विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती दिग्विजय शिंदे, मोहन माने, हरीष डावरे, एस. के. चेले, अँड. शीतल चव्हाण, वामन डावरे, रामभाऊ गायकवाड, दत्ताभाऊ रोंगे, विजय वाघमारे, कमलाकर सूर्यवंशी, सुभाष सोनकांबळे, पोपटराव सोनकांबळे, धीरज बेळंबकर, सतीश सुरवसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील धम्मप्रेमी नागरिकांनी धन्म परिषदेला उपस्थित रहाण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष विलास खिल्लारे, उपाध्यक्ष मत्सेंद्र सरपे, सचिव संजीव ओव्हळ, कोषाध्यक्ष कैलास शिंदे, संचालक डॉ. रत्नदीप गायकवाड, मिलिंद सुर्यवंशी, संजय सरपे, दिलीप भालेराव आदींनी केले आहे.