अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना

0

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना

             उस्मानाबाद,दि.27(जिमाका):  उस्मानाबाद नगरपालिका/उस्मानाबाद शहराच्या ठिकाणी इयत्ता 11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील  घेता यावे म्हणून भोजन,निवास व इतर शैक्षणिक सुविधा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,स्वाधार योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येतात.याकरिता शैक्षणिक वर्ष सन 2020-21 (नवीन व नुतनिकरण) या वर्षातील प्रवेशित अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांकडून दि. 31 डिंसेबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

            या  योजनेचा विहीत नमून्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण कार्यालय उस्मानाबाद येथे उपलब्ध असून शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या/शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या पात्र अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील इयत्ता 11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 31 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top