लोकनेते, बहुजनांचे कैवारी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची ७२ वी जयंती निमित्त आज प्रतिष्ठान भवन भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात अभिवादन

0

उस्मानाबाद :- लोकनेते, बहुजनांचे कैवारी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची ७२ वी जयंती निमित्त आज प्रतिष्ठान भवन भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले

    स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांची ७२ वी जयंती निमित्त प्रतिष्ठान भवन येथे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले 

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, शैक्षणिक संस्था संघटनेचे जिल्हाध्यक्ष व भाजपा वरिष्ठ नेते पांडुरंग लाटे गुरुजी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, नगरपरिषद उपनगराध्यक्ष अभय इंगळे, उस्मानाबाद विधिज्ञ बार संघटनेचे अध्यक्ष नितीन भोसले, सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, भाजपा जिल्हा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अर्चना अंबुरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर पाटील, एडवोकेट खंडेराव चौरे, नगरसेवक गणेश खोचरे, अमोल पेठे, ओम नाईकवाडी आदींसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top