परंडा तालुक्यातील -शेळगाव मधील नागरिकांना कळविण्यात आनंद होतो की, शेळगाव मध्ये आजपर्यंत कोणत्याही कंपनीचे चांगले नेटवर्क नव्हते.परंतु दि.27/12/21 पासून शेळगाव मध्ये जिओ चे टाॅवर चालू झाले आहे जवळपास दोन वर्षे झाले कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्या काळात राज्य सरकारने मोबाईलच्या नेटवर्क वर ओनलाईन शाळेचे तास सुरु होते परंतू शेळगाव मध्ये आयडिया, व्होडाफोन,बी.एस.एन एल या कुठल्याच मोबाईलच्या नेटवर्कची सर्विस व्यवस्थित चालत नव्हती त्यामुळे मुलांच्या ओनलाईन तासाचा अभ्यासक्रम पहण्यासाठी मिळत नसे.त्यामुळे शेळगाव चे अँड.सुभाषराव मोरे यांनी मुलाच्या अभ्यासक्रम मोबाईल वर पहता येत नव्हता म्हणून कुठल्याही नेटवर्कचा शेळगाव मध्ये टाँवर आण्याचा निर्धार घेतला..
त्यांनी जिओ चा टाँवर बसवला आसुन दि.28/12/2021 वार मंगळवार रोजी जिओ मोबाईल टॉवरचे उद्घघाटन माणिकबाबा माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय शेळगावचे माजी प्राचार्य मा.संभाजीराव मोरे पाटील , युवा नेते तथा उव्देजक मा.अमर भैय्या मोरे पाटील, सरपंच विष्णूनाना शेवाळे,उप सरपंच राजेंद्र जगताप , प्राचार्य गुरुदास काळे यांच्या हस्ते करण्यात आले,या वेळी विलास मोरे पाटील, परदेशी सर,राजू शिंदे, माजी सरपंच बाळासाहेब शेवाळे, बाबुराव आप्पा दैन, सुनील इनामदार माणिकबाबा विद्यालय शेळगावचे सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व. ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेळगाव मध्ये असणारी नेटवर्क समस्या दूर होवून जनतेची सोय झाली आहे.या मुळे बॅंक , मोबाईल रेंजचा प्रश्न मिटला आहे व लवकरच शेळगाव मध्ये A.T.M. सुरू करण्यात येईल असे युवा नेते अमर भैय्या मोरे पाटील यांनी सांगितले.