पांडुरंग मते आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

0

उस्मानाबाद/ प्रतिनिधी
क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा उस्मानाबाद यांच्याकडून साप्ताहिक तेरणेचा छावा वृत्तपत्राचे संपादक पांडुरंग मते यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


      पुरस्कार सोहळा क्रांतीवीर लहुजी साळवे चौकामध्ये रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी पार पडला यावेळी क्रांतीवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभिमान पेठे सल्लागार सुरेश खंदारे , राघु विश्वनाथ कसबे, राजकीय कट्टाचे संपादक प्रा. सतीश मातने, सामाजिक कार्यकर्ते दत्तू कसबे, बापू माळी आदी उपस्थित होते. ट्रॉफी ,प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ  देऊन सन्मान करण्यात आला.


आपण पत्रकारितेतून समाज भिमुख प्रश्न मांडून निर्भीडपणे व निपक्षपातीपणे समाजाचे वास्तव चित्रण करून सामाजिक राजकीय प्रश्नांची वस्तुनिष्ठ मांडणी करून समाजाला नेहमी न्याय देण्याचा व सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत यापुढे असेच कार्य आपल्या हातून घडो अशी सदिच्छा  जिल्हाध्यक्ष अभिमान पेठे यांनी आपल्या प्रस्ताविक कार्यक्रमात केली.

संपादक पांडूरंग मते यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल मित्र परिवार, हितचिंतकातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top