google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात अभिवादन

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंचायत समिती सभागृहात अभिवादन

0


       उस्मानाबाद,दि.03(जिमाका):- भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी, थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील पंचायत समितीच्या सभागृहात सभापती श्रीमती हेमा महेश चांदणे, उपसभापती प्रदीप तानाजी शिंदे आणि गट विकास अधिकारी सुरेश तायडे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सदस्य विराट शाहुराज पाटील, आशिष हर्षवर्धन नायकल, सहाय्यक प्रशासन अधिकारी माने मो.रा., कनिष्ठ प्रशासन अधिकारी जाधवर एल.के., पांचाळ बी.सी. आणि इतर पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top