उस्मानाबाद जिल्ह्यात ३ ठिकाणी मारहाण , १ ठिकाणी अपहरण

0




उस्मानाबाद जिल्ह्यात ३ ठिकाणी मारहाण , १ ठिकाणी अपहरण 


अपहरन.

उस्मानाबाद जिल्हा : कळंब तालूक्यातील एक 15 वर्षीय मुलगी दि. 17.01.2022 रोजी 21.00 वा. सु. आपल्या आजोळी असतांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तीचे अपहरन केले आहे. अशा मजकुराच्या अपहृत मुलीच्या पित्याने दि. 18 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 

मारहान.

मुरुम पोलीस ठाणे : आलुर, ता. उमरगा येथील कलाप्पा राठोड, सुनिता राठोड, पंडीत राठोड, शुभम राठोड, शिवाजी राठोड, सुनिता शिवाजी राठोड, सागर राठोड या सर्वांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 17.01.2022 रोजी 18.00 वा. सु. स्वामीनाथ व्यंकट राठोड यांसह त्यांची आई काशीबाई यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लोखंडी गज, वीट, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. यावेळी स्वामीनाथ यांचा भ्रमणध्वनी कलाप्पा राठोड यांनी जमीनीवर आदळून फोडून आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या स्वामीनाथ राठोड यांनी दि. 18 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 143, 147, 149, 427, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

लोहारा पोलीस ठाणे : हिप्परगा (रवा), ता. लोहारा येथील खंडु काशिनाथ राठोड यांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 02.01.2022 रोजी 20.00 वा. सु. संजय ज्ञानोबा राठोड, वय 35 वर्षे यांना त्यांच्या घरासमोर ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी गज डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या संजय राठोड यांनी दि. 18 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 336 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

नळदुर्ग पोलीस ठाणे : नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील समदानी बाडेवाले व शफीक बाडेवाले हे दोघे पिता- पुत्र दि. 14.01.2022 रोजी 11.30 वा. सु. नळदुर्ग गट क्र. 202 (क) मधील शेतात काम करत होते. यावेळी अब्दुल बसी अब्दुलगनी बाडेवाले व समीन बाडेवाले या दोघा पिता- पुत्रांनी जुन्या वादावरुन समदानी यांसह त्यांचा मुलगा- शफीक यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, खोऱ्याच्या दांड्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शफीक बाडेवाले यांनी दि. 18 जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top