जिल्हा बँक निवडणूक ; आज अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत ! राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी !

0

 उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज सोमवारी २४ जानेवारी अंतिम मुदत आहे .
आतापर्यंत एकूण ३४५ अर्जाची विक्री झाली आहे तर २५ अर्ज दाखल करण्यात आले आहेत . अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी डीसीसी बँक निवडणूक कार्यालयात शेवटच्या काही तासात मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

 

निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप , सेना , राष्ट्रवादीसह आली आहे त्यामुळे आगामी काँग्रेसकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यातराजकीय काळात कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडतात ? याकडेच नागरिकांचे लक्ष वेधले आहे . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या १५ जागेसाठी निवडणूक घेण्यात येत आहे . 

मंगळवार 18 जानेवारी पासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाली आहे . शुक्रवारपर्यंत एकूण २५ अर्ज निवडणूक विभागाकडे दाखल झाले आहेत तर एकूण ३४५ अर्जांची विक्री झाली आहे . अर्जांची विक्रमी विक्री झाल्याने या निवडणुकीत अटीतटीच्या लढती रंगण्याची चिन्ह दिसत आहेत . 

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय येथील निवडणूककार्यालयात नामनिर्देशनाची व्यवस्था करण्यात आली आहे . आज सोमवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत आहे . 

त्यामुळे सोमवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात राजकीय पदाधिकारी , इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी होणार असल्याचे स्पष्ट आहे. मंगळवारी ( दि . २५ ) निवडणूक कार्यालयात स . ११ वाजेपासून अर्जाची छाननी होणार आहे . २७ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत अर्ज मागे घेता येणार आहेत . २० फेब्रुवारी रोजी मतदान तर २१ फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे . १० फेब्रुवारी राजी अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम मुदत असल्याने त्या दिवशीच निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे निवडणुकीतील युती , आघाडी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय जाहीर न झाल्याने संभ्रमावस्था कायम आहे . दरम्यान , जिल्हा बँकेच्या सत्तेची खुर्ची काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार व्युहरचना आखली आहे . बँकेचे एकूण ८०८ मतदाराच निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या जय , पराजयाचा फैसला करणार आहेत . त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या राजकीय घडामोडी घडतात ? याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top