आमदार राणा जगजितसिंह पाटील वैद्यकीय सल्यानुसार पुढील काही दिवस विलगीकरणामध्ये राहणार आहे अशी माहिती काही वेळापूर्वी फेसबुक पेज द्वारे दिली आहे फेसबुक पेज पोस्टमध्ये काय लिहिले आहे वाचा सविस्तर खालील प्रमाणे
वैद्यकीय सल्यानुसार मी पुढील काही दिवस विलगीकरणामध्ये राहणार आहे !
मुंबई येथील निवासस्थानी कार्यरत एक कर्मचारी कोविड-१९ संक्रमित आढळल्याने संपर्कातील सर्वांची कोविड चाचणी करण्यात आली. यात ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वैद्यकीय सल्यानुसार मी पुढील काही दिवस विलगीकरणामध्ये राहणार आहे.
तातडीच्या कामासाठी कृपया निःसंकोचपणे ०२४७२२९५४४०, ८८८८६२७७७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, ही विनंती.
पुन्हा एकदा कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असून मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग यासह शासनाने दिलेल्या सूचना व नियमांचे पालन करा. आपणासह इतरांची काळजी घ्या.