उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विक्री विरोधी उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी काल दि. 06.01.2022 रोजी 24 ठिकाणी छापे मारुन देशी- विदेशीच्या एकुण 101 बाटल्या मद्य, 215 लि. गावठी मद्य जप्त केला. तसेच गावठी मद्य निर्मीतीचा 900 लि. द्रवपदार्थ जप्त करण्यास व सांभाळण्यास अशक्य असल्याने तो पोलीसांनी जागीच ओतून नष्ट केला आहे. या प्रकरणी संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध काद्यांतर्गत खालील प्रमाणे 24 गुन्हे नोंदवले आहेत
1) उमरगा पो.ठा. च्या पथकाने 5 ठिकाणी छापे मारले असता यात चिंचोली ग्रामस्थ- सागर चौधरी हे येळी शिवारातील एका हॉटेलजवळ 1,530 ₹ किंमतीच्या विदेशी दारुच्या बाटल्या बाळगलेले, उमरगा ग्रामस्थ- अन्वर शेख, मेहबुब नदाफ हे दोघे अनुक्रमे आपापल्या राहत्या परिसरात एकुण 18 लि. हातभट्टी दारु बाळगलेले, गुंजोटी ग्रामस्थ- दत्तात्रय थोरात हे गावातील छ. शिवाजी महाराज चौकात 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले तर काळेवाडी ग्रामस्थ- अजित पालमल्ले हे गाव शिवारात 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना आढळले.
2) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे मारले यात काळेगाव येथील शामल जाधव या आपल्या घरासमोर 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या तर आरळी (बु.), ता. मारुती कचरे हे त्यांच्या शेतातील गोठ्यासमोर 26 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना आढळले.
3) शिराढोन पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे मारले असता यात घारगाव तांडा येथील भिमराव राठोड हे तांडा परिसरात 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेले, पारधी पिढी, शिराढोन येथील सिमा काळे या आपल्या घरासमोर 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेले तर जवळा (खु.) ता. कळंब येथील भारत धावारे हे गाव शिवारात देशी- विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या बाळगलेले असतांना आढळले.
4) कळंब पो.ठा. च्या पथकाने 4 ठिकाणी छापे मारले असता यात कळंब ग्रामस्थ- देवानंद कसबे व मालन पवार हे दोघे आपापल्या घरासमोर एकुण 21 लि. हातभट्टी दारु बाळगलेले, एकतानगर, डिकसळ येथील लालाबाई पवार या राहत्या गल्लीत एका शेडमध्ये गुळ- पणी मिश्रीत हातभट्टी दारु निर्मीतीचा 800 लि. द्रव पदार्थ प्लास्टीकच्या 4 पिंपांत बाळगलेल्या तर कोठाळवाडी, ता. कळंब येथील आबा कांबळे हे गावातील ईटकुर – कळंब रस्त्यालगत 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना आढळले.
5) भुम पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे मारले असता यात बहाणपुर ग्रामस्थ- सुभाष काळे हे आपल्या घराजवळ गुळ- पणी मिश्रीत हातभट्टी दारु निर्मीतीचा 50 लि. द्रव पदार्थ बाळगलेले, बावी, ता. भुम येथील मुकुंद कांबळे हे पाथ्रुड येथील एका हॉटेलसमोर देशी दारुच्या 18 सिलबंद बाटल्या बाळगलेले तर आरसोली, ता. भुम ग्रामस्थ- मुक्ताबाई पवार या आपल्या घरासमोर गुळ- पाणी मिश्रीत हातभट्टी दारु निर्मीतीचा 50 लि. द्रव पदार्थ बाळगलेल्या असतांना आढळल्या.
6) ताकविकी, ता. उस्मानाबाद येथील अब्बास शेख हे आपल्या शेडजवळ देशी दारुच्या 19 सिलबंद बाटल्या बाळगलेले असतांना बेंबळी पोलीसांना आढळले.
7) रोसा, ता. परंडा येथील अमोल ओव्हाळ हे गाव शिवारात देशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या व 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना परंडा पोलीसांना आढळले.
8) आनाळा, ता. परंडा येथील बालाजी पवार हे गावातील प्राथमीक आरोग्य केंद्रालगतच्या त्यांच्या शेडमध्ये 180 मि.ली. क्षमतेच्या 25 बाटल्या देशी दारु बाळगलेले असतांना अंबी पोलीसांना आढळले.
9) तडवळा, ता. तुळजापूर येथील सिध्देश्वर जाधव हे गावातील काक्रंबा रस्त्यालगत देशी- विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या बाळगलेले असतांना तुळजापूर पोलीसांना आढळले.
10) उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे मारले असता यात गुंजेवाडी ग्रामस्थ- सहदेव जाधव व गावसुद ग्रामस्थ- राजेंद्र पवार हे दोघे पारधी पिढी, गावसूद येथे एकुण 40 लि. हातभट्टी दारु बाळगलेले तर सारोळा (बु.) येथील साखरबाई पवार या आपल्या घरासमोर 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असतांना आढळल्या.