हातभट्टी निर्मिती कारखान्यावर छापा लाखाचा मुद्देमाल जप्त

0
तुळजापूर  - तालुक्यातील खडकी तांडा येथील हातभट्टी निर्मीती केंद्रावर उत्पादन शुल्क पोलिस यांनी संयुक्त पणे टाकलेल्या धाडी त रसायन ने भरलेले बँरेल सह  १,०२,०००/रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

ही कारवाई शुक्रवार दि२८रोजी पहाटे सात वाजता करण्यात  आली
या बाबतीत अधिक माहीतीअशीकि  तुळजापूर तालुक्यातील खडकी तांडा परिसरात हातभट्टी निर्मिती केंद्र सुरु असल्याची माहीती मिळताच 
विभागीय उपआयुक्त , औरंगाबाद विभाग , औरंगाबाद श्री.पी.एच.पवार साहेब यांचे आदेशानुसार व मा . अधीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , उस्मानाबाद विजय चिंचाळकर व निवा जैन पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद , नवनित कावत अप्पर पोलीस अधीक्षक , उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन तामलवाडी व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तुळजापुर , निरीक्षक सिमा तपासणी नाका रा.उ.शु. उमरगा , दुय्यम निरीक्षक रा.उ.शु. तुळजापुर व दुय्यम निरीक्षक , रा.उ.शु. उमरगा या कार्यालयांनी सामुहीकरित्या मौजे खडकी तांडा ता . तुळजापुर जि . उस्मानाबाद शिवारात हातभट्टी निर्मीती केंद्रावर छापा घालुन दारूबंदी कायदा १ ९ ४ ९ अंतर्गत सुधारीत अधीनीयम २००५ मधील कलम ६५ ( क ) ( फ ) ०३ गुन्हे नोंद करून सदर गुन्हयामध्ये एकुण रसायण भरलेले २० बॅरेल अंदाजे ४००० लीटर , २०० लीटर क्षमतेचे रिकामे रसायणाच्या वासाचे एकुण १० बॅरेल , २० लीटर क्षमतेच्या प्लॅस्टीक घागरी १२ नग तसेच तयार हा . भ . दारू रबरी टयुबमध्ये १५० लीटर आसा एकुण १,०२,००० / - किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला . 

मिळुन आलेला मुद्देमाल वहातुकीस योग्य नसल्याने तो जागीच नाश करण्यात आला सदरची कारवाई तुळजापूर येथील राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाचे निरीक्षक सचिन भवड , निरीक्षक जे.बी. चव्हाणके , सहा . पोलीस निरीक्षक  सचीन पंडीत , दुय्यम निरीक्षक सी.डी.कुंठे दुय्यम निरीक्षक  एस.बी.सिद , स.दु.नि.काळे , कोरे , रा.उ.शु जवान , हजारे , कोळी , चांदणे , ठाकुर , .कलमले , तसेच पोलीस स्टेशन तामलवाडी पो.काँ . शिरसाठ , गायकवाड , खुने , यांनी केली आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top