राज्य सरकारच्या नाकर्तेपणा मुळे जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्या पासून वंचित - आमदार राणाजगजितसिंह पाटील

0


Osmanand :- 

राज्य सरकारच्या नाकर्तेपणा मुळे जिल्ह्यातील शेतकरी २०२० च्या पीक विम्या पासून वंचित असून न्यायालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निश्चितच न्याय मिळवून देवू असे प्रतिपादन राणाजगजितसिंह पाटील यांनी काल दि२८/०१/२०२२ रोजी समुद्रवाणी ताउस्मानाबाद येथे रु१९ लक्ष किमतीच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना केले.

 

समुद्रवाणी येथील ग्रामस्थांची हिंदू  मुस्लीम स्मशानभूमीच्या संरक्षक भिंत बांधकामासाठी एकाच वेळी निधी देण्याची मागणी होतीत्यामुळे आमदार स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून हिंदू स्मशानभूमीसाठी रु१० लक्ष   जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुस्लिम स्मशानभूमीसाठी रु लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आलाया कामांसह गावांतर्गत सिमेंट रस्त्यांसाठी १५ व्या वित्त आयोगातील रु लक्ष निधीच्या कामांचे भूमिपूजन राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 

यावेळी बोलताना राणाजगजितसिंह पाटील साहेब म्हणाले किराज्य सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्यामुळे नुकसान होवून देखील शेतकरी भरपाई पासून वंचित आहेतसरकारच्या अकार्यक्षमतेमुळे पीक विम्यासाठी न्यायालयात दाद मागावी लागली आहेमाउच्च न्यायालयाच्या निदर्शनास सर्व बाबी आणून दिल्या असून शेतकऱ्यांना निश्चितच न्याय मिळवून देवू अशी ग्वाही त्यांनी दिलीशासन परिपत्रकातील तरतुदीचा चुकीचा अर्थ लावत खरीप २०२१ मधील पीक विम्याची रक्कम देखील अर्धीच देण्यात आली आहेत्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेतमात्र सरकार याबाबत ठाम भूमिका घेत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

 

तुळजाभवानी साखर कारखाना चालू करण्यात यश आले असून तेरणा देखील लवकरच सुरु होईलमात्र काही राजकीय मंडळी यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितलेलघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार अभिनव योजना राबवीत असून त्यांचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी उपस्थित युवकांना केलेगावातील हिंदू मुस्लीम सौदार्ह्य बद्दल त्यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले.

 

यावेळी जि..अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळेजिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळेमाजी जि.अध्यक्ष श्री.नेताजी पाटीलसरपंच शिवाजी पसारेउपसरपंच रामभाऊ गव्हाणेजेष्ठ कार्यकर्ते युवराज ढोबळेमाजी सरपंच ज्ञानेश्वर जंगालेहुसेन शेरीकरचन्नुमिया मेंडकेअस्लम मेंडकेफक्रु मेंडकेलक्ष्मण घुलेबबनराव ढोबळेगुरुलिंग स्वामीतानाजी गायकवाडनागप्पा पवारनवनाथ बनकरसंजय स्वामीदयानंद शिंदेजयराम ढोरमारे  यांच्यासह प्रमुख पदाधिकारीकार्यकर्ते  ग्रामस्थ उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top