उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विक्री विरोधी उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी काल दि. 28.01.2022 रोजी 22 ठिकाणी छापे मारुन देशी- विदेशी व बियरच्या अशा एकुण 109 बाटल्या मद्य, 20 लि. शिंदी अंमली द्रव व 167 लि. गावठी मद्य जप्त केला. या प्रकरणी संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध काद्यांतर्गत खालील प्रमाणे 22 गुन्हे नोंदवले आहेत.
1) उमरगा पो.ठा. च्या पथकाने 5 ठिकाणी छापे मारले असता यात उमरगा ग्रामस्थ- शिवाजी पुरातले हे महात्मा फुले नगर, उमरगा येथे 8 लि. हातभट्टी दारु बाळगलेले, काळेवाडी ग्रामस्थ- अजित पालमपल्ले हे आपल्या घरासमोर 9 लि. हातभट्टी दारु बाळगलेले, तुरोरी, ता. उमरगा येथील पिऱ्या गुत्तेदार हे गाव शिवारात 20 लि. शिंदी हे अंमली द्रव बाळगलेले, मुळज तांडा येथील मनोहर राठोड हे काराळी फाटा येथे 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेले तर शास्त्रीनगर तांडा, ता.उमरगा येथील धनु राठोड हे राहत्या परिसरात 5 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना पथकास आढळले.
2) कळंब पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे मारले असता यात कळंब ग्रामस्थ- शंकर पवार हे कळंब येथील बाजार मैदान परिसरात 19 लि. हातभट्टी दारु बाळगलेले, गायरान पारधी पिढी, ता. कळंब येथील शारदा शिंदे या आपल्या पारधी पिढीवर 18 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या तर वैतागवाडी वस्ती, मोहा, ता. कळंब येथील विजय विदुर हे गावातील खामसवाडी रस्त्याकडेला 19 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना पथकास आढळले.
3) वाशी पो.ठा. च्या पथकाने 4 ठिकाणी छापे मारले असता यात शिवशक्तीनगर, वाशी येथील बेबी पवार या आपल्या पत्रा शेडसमोर 9 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या, पिंपळगाव (लिं.), ता. वाशी येथील सज्जन गाडे हे आपल्या घरासमोर 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेले, दसमेगाव, ता. वाशी येथील सखुबाई शिंदे या आपल्या शेडमागे 20 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या तर अंजनसोंडा, ता. भुम येथील निलावती कांबळे या 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 7 बाटल्या बाळगलेल्या असतांना पथकास आढळल्या.
4) परंडा पो.ठा. च्या पथकाने 4 ठिकाणी छापे मारले असता यात परंडा येथील ज्योती पवार, अजय पवार, युसूफ शिकलकर हे तीघे वेगवेगळ्या तीन ठिकाणी एकुण 10 लि. हातभट्टी दारु व विदेशी दारुच्या 30 बाटल्या बाळगलेले तर माणकेश्वर, ता. भुम येथील सुधाकर घोडके हे गाव शिवारात 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 14 बाटल्या बाळगलेले असतांना पथकास आढळले.
5) लोहारा पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे मारले असता यात लोहारा येथील जयश्री माने या साखर कारखाना परिसरात वाहने उभा करण्याच्या परिसरात 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 16 बाटल्या बाळगलेल्या तर भातागळी, ता. लोहारा ग्रामस्थ- संतोष तेलंग हे आपल्या घरासमोर 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 14 बाटल्या बाळगलेले असतांना पथकास आढळले.
6) जांब, ता. भुम येथील अशिष भोरे हे गावातील एका हॉटेलसमोर 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 16 बाटल्या बाळगलेले असतांना भुम पो.ठा. च्या पथकास आढळले.
7) तुळजापूर नाका पारधी पिढी, उस्मानाबाद येथील संगीता काळे या आपल्या घरासमोर 15 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या असतांना उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळल्या.
8) नळदुर्ग येथील आकाश कांबळे हे आपल्या पत्रा शेडसमोर 5 लि. हातभट्टी दारु बाळगलेले असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.
9) पानगाव, ता. कळंब येथील सुग्रीव बेडके हे गावातील रस्त्याकडेला 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 12 बाटल्या बाळगलेले असतांना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले.