उस्मानाबाद जिल्हा : जुगार विरोधी कारवाई दरम्यान उस्मानाबाद पोलीसांनी काल दि.28.01.2022 रोजी सहा वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. या छाप्यात जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त करुन 13 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कयाद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे 6 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवले आहेत.
1) आळणी, ता. उस्मानाबाद येथील अमर कोळी हे गाव शिवारातील एका हॉटेलजवळ कल्याण मटका जुगार साहित्यासह 450 ₹ रक्कम बाळगलेले तर शिंगोली ग्रामस्थ- ऋषीकेश रणशंगारे हे सारोळा गावात एका झाडाखाली कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 510 ₹ रक्कम बाळगले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढहले.
2) रांजणी, ता. कळंब येथील जावेद शेख, मोहन गायकवाड, महेबुब शेख, मच्छिंद्र लगसकर हे सर्व गावातील एका पत्रा शेडमध्ये तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्यासह 1,850 ₹ रक्कम बाळगले असतांना शिराढोन पो.ठा. च्या पथकास आढळले.
3) येरमाळा येथील वैभव भोईटे हे चोराखळी गावातील खंडोबा मंदीराजवळ मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 830 ₹ रक्कम बाळगले असतांना येरमाळा पो.ठा. च्या पथकास आढळले.
4) आळंद येथील बंदु काळे, मोहन सगट, मल्लु पवार, प्रकाश साखरे, सलिम चव्हाण हे सर्व कसई येथील जि.प. शाळेसमोर तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्यासह 1,140 ₹ रक्कम बाळगले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.
5) उस्मानाबाद येथील राजाभाऊ कांबळे हे तेरणा टीपी येथे मिलन नाईट मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह 1,620 ₹ रक्कम बाळगले असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.