जिल्हयातील शाळांमधील वर्ग टप्या टप्याने सुरू करणार सध्या दहावी व बारावीचे वर्ग सुरू,नववी व अकरावीचे वर्ग ३१ जानेवारीपासून - Classes Ninth and Eleventh start from 31st January
उस्मानाबाद जिल्ह्यात मोत्यांची शेती...👇👇👇
उस्मानाबाद,दि.27(जिमाका) :जिल्हयातील शाळांमधील वर्ग टप्या टप्याने सुरू करण्यात येणार आहेत.सध्या गेल्या 24 जानेवारीपासून जिल्हयातील दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत.तर येत्या 31 जानेवारी 2022 पासून नववी आणि अकरावीचे वर्ग सुरू ( Classes Ninth and Eleventh start from 31st January ) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि जि.प.चे.मुख्यकार्याकारी अधिकारी राहूल गुप्ता यांनी जारी केले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य शासनाने 8 जानेवारी 2022 च्या निर्देशानुसार राज्यातील शाळा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.दरम्यान, राज्याच्या काही भागात जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातील शाळा सुरू करण्याची सततची मागणी लक्षात घेऊन 20 जानेवारी 2022 रोजी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत महापालिका क्षेत्रात आयुक्तांना तर इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी आणि जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना अधिकार दिले आहेत.यांचाच आधार घेऊन जिल्हयातील स्थानिक कोरोना परिस्थितीचा विचार करून जिल्हयातील सर्व शाळा सुरु करण्यास मान्यता न देता 24 जानेवारी 2022 पासून जिल्हयातील शालेय शिक्षण विभागाशी संबंधित वर्ग टप्या टप्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीचे वर्ग 24 जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात आले आहेत.त्यामुळे जिल्हयातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांतील दहावी आणि बारावीचे वर्ग कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपायोजनाचे पालन करण्याच्या अटीवर पुर्ववत सुरू राहणार आहेत.
जिल्हयातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांमधील नववी आणि अकरावीचे वर्ग येत्या जानेवारी 2022 पासून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे पालन करण्याच्या अटीवर पुर्ण वेळ नियमित सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे, तर उर्वरित पहिली ते आठवी पर्यंतचे वर्ग 5 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद राहणार आहेत.परंतु या बंद कालावधीत मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी पूर्ण वेळ शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना ऑन लाईन अध्यापन करावे.जिल्हयातील कोरोना साथीच्या प्रादुर्भावाच्या स्थितीचा विचार करून पहिली ते आठवीचे वर्ग टप्या टप्याने सुरू करण्याचे निर्देश देण्यात येतील असेही या आदेशात म्हटले आहे.