भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह नगर परिषद समोर उपहासात्मक आंदोलन

0




उस्मानाबाद :- भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह नगर परिषद समोर उपहासात्मक आंदोलन करण्यात आले

मा.आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब हे राज्यमंत्री असतांना उस्मानाबाद च्या नाटयगृहाकरिता ५ कोटी रुपये २००८ साली मंजुर करुन उदघाटन २००९ साली आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले होते.

गेल्या पंचवार्षीक मध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष असल्यापासून ते आज तगायत पर्यंत नाटयगृह चालु करण्या करिता कुठलीली कार्यवाही झाली नाही. त्या नाटयगृहामध्ये अनेक कामे निविदा होऊन देखील अपूर्णच आहेत. नादुरुस्त व अपूर्ण असलेल्या नाटयगृह परिसरात सद्यस्थितीस तळीरामांचा अड्डा बनला आहे तसेच प्रवाशी वाहतुक करण्याचा वाहनांचा पार्कींग म्हणून वापर चालु आहे. मुख्याधिकारी यांची भेट घेऊन जाब विचारला असता नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी येत्या दोन महिन्यात अपूर्ण कामे पूर्ण करुमार्च अखेरपर्यंत पूर्ण करु असे आश्वासन दिले.

नाटयगृह आंदोलनाचा भाग म्हणून त्रिमुर्ती प्रॉडक्शन निर्मित ३ नाटकांचे प्रयोग ठेवण्यात आले होते. १) १ माणूस १२ भानगडी – दुपारी १२ ते ३२) एका लग्नाची दुसरी गोष्ट – सांय ६ ते ९३) एकच प्याला- रात्री ९ ते १२.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष सुनिल काकडेयुवा मार्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकरमाजी उपनगराध्यक्ष अभय इंगळेशहराध्यक्ष राहुल काकडेयुवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुजित साळुंकेनगरसेवक प्रविण पाठकअभिजीत काकडेदाजीप्पा पवारभाजपा ओबीसी उपाध्यक्ष लक्ष्मण मानेशेषेराव उंबरेविनोद निंबाळकरपंकज जाधवअमोल राजे निंबाळकरसंदीप इंगळेतसेच युवा मोर्चाचे ॲड.कुलदिपसिंह भोसलेप्रितम मुंडे,राहुल शिंदेदेवकन्या गाडेविद्या मानेओम नाईकवाडीराज निकमगणेश इंगळगीगणेश देशमुखओमकार देशमुखमेसा जानरावविशाल पाटीलअक्षय भालेरावॲड.कुणाल व्हटकररोहीत देशमुखप्रसाद मुंडेअतुल चव्हाणसागर दंडनाईकगणेश मोरेदादुस गुंडअमित कदमस्वप्नील नाईकवाडीजगदीश जोशी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top