उस्मानाबाद जिल्ह्यात ढोकी, तामलवाडीत अपघात , भुम , येरमाळा , लोहारात मारहाण गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात ढोकी, तामलवाडीत अपघात ,  भुम , येरमाळा , लोहारात मारहाण गुन्हे दाखल.

अपघात.

ढोकी पोलीस ठाणे : बोरगाव (बु.), ता. कळंब येथील निशीकांत बाळासाहेब खांडेकर हे दि. 02.02.2022 रोजी 19.30 वा. सु. ढोकी येथी रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एटी 9965 ही चालवत जात होते. यावेळी ॲपे मॅझीक वाहन क्र. एम.एच. 13 एएक्स 8286 हे निशीकांत यांच्या मोसाला ओव्हरटेक करत असतांना ॲपे मॅझीकच्या पाठीमागील बाजूचा निशीकांत यांच्या मोसाला धक्का लागून ते खालीपडून ॲपे मॅझीक वाहनाच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे पिता- बाळासाहेब रावसाहेब खांडेकर यांनी दि. 12.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद वाहनाच्या अज्ञात चालकाविरुध्द भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

तामलवाडी पोलीस ठाणे : चालक- लक्ष्मीकांत प्रभाकर मेटे, रा. उस्मानाबाद यांनी दि. 28.12.2021 रोजी 10.30 वा. सु. तामलवाडी येथील रस्त्यावर वाहन क्र. एम.एच. 13 डीई 2157 हे निष्काळजीपने चालवल्याने रस्त्याने पायी जाणाऱ्या विक्रम रामकृष्ण पंडीत, वय 50 वर्षे यांना पाठीमागून धडकल्याने ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर नमूद चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या विक्रम पंडीत यांनी दि. 12.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 

मारहान.

भूम पोलीस ठाणे : सावरगाव, ता. भूम येथील बापु अभिमान यादव हे दि. 12.02.2022 रोजी 17.00 वा. सु. गावातील आपल्या गॅरेज दुकानासमोर थांबले होते. यावेळी अंतरवली, ता. भूम येथील विष्णु नाईकवाडी, पंढरीनाथ नाईकनवरे, वैभव नाईकनवरे, शोभा नाईकनवरे या सर्वांनी दहा वर्षे पुर्वीचा आर्थिक व्यवहार उकरुन काढून बापु यादव यांना शिवीगाळ केली. तसेच लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बापु यादव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा पोलीस ठाणे : दशमेगाव, ता. वाशी येथील ईश्वर अरुण शिंदे, हारणाबाई शिंदे, आरुण शिंदे या तीघांनी जुन्या वादाच्या कारणावरुन दि. 08.02.2022 रोजी 17.00 वा. सु. बोरगाव फाटा येथील सुरेश रामदास शिंदे यांना त्यांच्या घरासमोर शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच ईश्वर शिंदे यांनी सुरेश यांच्या काखेजवळ चावा घेउन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या सुरेश शिंदे यांनी दि. 12.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

लोहारा पोलीस ठाणे : लोहारा (बु.), ता. लोहारा येथील महादेव विजय गोरे, वय 31 वर्षे हे दि. 12.02.2022 रोजी 10.00 वा. सु. लोहारा येथील रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी त्यांच्या मोसाला ग्रामस्थ- प्रतिक दत्ता रसाळ, वय 22 वर्षे यांच्या वाहनाचा धक्का लागल्याने गोरे यांनी त्यांना जाब विचारला. यावर रसाळ यांनी चिडून जाउन गोरे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान करुन दगड फेकून मारुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या महादेव गोरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top