चिंतामणी गणेशोत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम,पशूंना लंपी प्रतिबंधक लसीकरण

0

चिंतामणी गणेशोत्सव समितीचा स्तुत्य उपक्रम,
पशूंना लंपी प्रतिबंधक लसीकरण

लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील वार्ड क्रमांक 9 मधील चिंतामणी गणेश उत्सव समिती यांच्यामार्फत पशूंना लंपी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. सध्या महाराष्ट्रामध्ये लंपी रोगाने थैमान घातले असून विविध जनावरांना लंपी रोग होत आसुन या मुळे पशु पालकामध्ये चिंतेचे वातावरन पसरले आसुन हिच गोष्ट ध्यानात ठेवुन सामाजीक बांधिलकी जपत चिंतामणी गणेश चाळ यांनी पशूंना लसीकरण केले.

यावेळी चिंतामणी गणेश चाळ गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत थोरात बाळू माशाळकर रामेश्वर मिटकरी विनायक वेदपाठक सुरज पुकाळे कपिल माशाळकर काकासाहेब घोडके मल्लिनाथ घोंगडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  के.डी.पाटील, जयसिंग बंडगर, प्रकाश होडराव,अदि, कार्यकर्त्यांनी लसीकरणासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top