चोरीच्या दोन मोटारसायकल, केबलसह सहा आरोपी अटकेत
अंबी पोलीस ठाणे : इनगोंदा, ता. परंडा येथील- मरिबा शंकर रंदिल यांच्या अंदाजे 31,000 ₹ किंमतीच्या डिस्कव्हर मोटारसायकल क्र. एम.एच. 15- 6825 व हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 15- 5947 अशा दोन मोटारसायकल दि. 10.09.2022 ते दि. 11.09.2022 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या होत्या. यावरुन मरिबा रंदिल यांनी दि. 13.09.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत अंबी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 122/2022 हा नोंद आहे.
तपासादरम्यान अंबी पो.ठा. च्या सपोनि- श्री. आशिष खांडेकर यांच्या पथकाने कौशल्यपुर्ण तपास करुन व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इनगोंदा येथील- शंकर रघुनाथ रणधीर, गुंडीराम बबन जाधव, किरण अरुण दणदिवे व आकाशे सुग्रीव सरवदे या चौघांना दि. 13 सप्टेंबर रोजी ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील नमूद चोरीच्या दोन मोटारसायकल हस्तगत केल्या आहे. तसेच तपासादरम्यान अंबी पो.ठा. येथे दाखल असलेल्या केबल चोरीच्या अन्य दोन गुन्ह्यात सांगवी ग्रामस्थ- सचिन भागवत गिरी व विठ्ठलवाडी ग्रामस्थ- समाधान कमलाकर गिरी या दोघांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून चोरीचे केबल हस्तगत केले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व उप विभागीय पोलीस अधिकारी, भुम श्री. दिनकर डंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबी पो.ठा. चे सपोनि- श्री. आशिष खांडेकर, पोहेकॉ- गजानन मुळे, पोकॉ- संदीप चौगुले, सतिश राऊत, बळीराम सोनटक्के यांच्या पथकाने केली असुन गुन्ह्याचा अधिक तपास पोहेकॉ- गजानन मुळे हे करत आहे.