भुसणी येथे आद्यक्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमीत्ताने महाआरोग्य शिबीर संपन्न

0

भुसणी येथे आद्यक्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमीत्ताने महाआरोग्य शिबीर संपन्न


उमरगा ( दत्ता चौधरी ) तालुक्यातील भुसणी येथे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश हिरमुखे तर उद्घाटक म्हणून धनराज हिरमुखे  होते.जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी  डॉ.अशोक बोळदे, डॉ. संतोष भाकरे ,मुरूम पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. रंगनाथ जगताप,ग्रामसेवक बालाजी निकम आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 महाआरोग्य शिबिरात नेत्रदान, मोफत चष्मा वाटप,मधुमेह,ई.सी.जी आदी रोगा विषयी निदान करण्यात आले. 

महाआरोग्य शिबीराचे आयोजन बेडर समाज संघटना भूसणी व ग्रामपंचायत कार्यालय भुसणी यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top