google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 छत्रपती संभाजी राजे यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षणासाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे लाक्षणिक उपोषण

छत्रपती संभाजी राजे यांच्या समर्थनार्थ मराठा आरक्षणासाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे लाक्षणिक उपोषण

0

तुळजापूर ( tuljapur ) :- 

छत्रपती संभाजी राजे मराठा आरक्षणासाठी उपोषण करित आहेत, आणी राज्य सरकार त्याची साधी दखल घेत नाही, हे दुर्दैवी आहे. राज्य सरकार मधील एकही मंत्री संभाजी राजे यांना भेटला नाही, ही बाब दुर्दैवी आहे. ठाकरे सरकार प्रत्येक अर्थाने गद्दार आहे. सरकारने प्रत्येकाला शब्द दिले, आश्वासने दिली मात्र ती सर्व फोल ठरली. त्यामुळे छत्रपती संभाजी राजे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी उद्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायती समोर, तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे अथवा तहसील समोर लाक्षणिक उपोषण करण्याचे आवाहन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आज तुळजापूर येथील लाक्षणीय उपोशानादार्म्यान बोलताना केले.

 

यावेळी बोलताना आमदार राणाजगजीतसिंह पाटील साहेब म्हणाले कि, मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी राजेंचा अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी बैठक बोलावली, १५ दिवसात सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले, संभाजीराजेंनी १५ दिवसाच्या ऐवजी दोन महिने घ्या असे सांगितले मात्र सहा महिने उलटून देखील सरकार कडून दिलेली वचने पाळली जात नाहीत. मराठा आरक्षण व समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याकरिता काहीही कार्यवाही होत नाही. मराठा समाजातील युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेणे, सारथी संस्थेचे सक्षमीकरण या कुठल्याच बाबीवर सरकार काही करत नाही. राज्य मागासवर्गीय आयोग गठित करायला सरकारला वर्षाहून अधिक कालावधी लागला, यानंतर आयोग गठीत केला मात्र मराठा समाजाच्या इंपेरिकल डेटा बाबत आयोगाला काहीच आदेश दिले नाहीत. आणि आता राजे उपोषणाला बसल्यानंतर दुसरा आयोग गठित करण्याचे मुख्यमंत्री बोलत आहेत. ही कृती पूर्णतः नियमबाह्य आहे असून एकाच राज्यात दोन मागासवर्ग आयोग नेमणे घटनात्मक आहे ? का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ठाकरे सरकारच्या माध्यमातून समाजहिताचा एकही निर्णय होत नाही, सरकार कोणते निर्णय घेते याबाबत आपण चांगलेच परिचित आहोत.

 

 जिल्ह्यातील इतर बांधवांशी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्हावासियांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोंचविण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील खासदार आमदार यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व  मुख्यमंत्र्यांची भेट घालून देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच छत्रपती संभाजी राजे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी उद्या जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायती समोर, तालुक्याच्या ठिकाणी जेथे उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे तेथे त्यासमोर व इतर ठिकाणी तहसीलसमोर अथवा नगर पंचायती समोर लाक्षणिक उपोषण करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे उद्या किंवा परवा जोपर्यंत छत्रपती संभाजी राजे यांच्या उपोषणाची दखल घेत नाही तोपर्यंत कोणत्याही मंत्र्याने जिल्ह्यात पाय ठेवूनच दाखवावा असे उघड आव्हान यावेळी बोलताना दिले.

 

बहुजन स्वाभिमान संघटना, अखिल भारतीय मराठा महासंघ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) रोजगार आघाडी,  मी वडार महाराष्ट्राचा, महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना, उस्मानाबाद डीलर्स असोसिएशन अंतर्गत श्री तुळजाभवानी तुळजापूर तालुका पेट्रोल पंप असोसिएशन, मुस्लिम, लिंगायत, ब्राम्हण, गुरव, हिंदू खाटीक समाज, तुळजाभवानी तुळजाभवानी पुजारी मंडळ, तुळजाई मिनी टेम्पो चालक-मालक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, दिव्यांग संघटना, परिवहन महामंडळ संघटना, अखिल भारतीय मराठा सेवा संघ,  मध्यवर्ती शिवजयंती समिती धाराशिव, सकल मराठा समाज प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना आदी संघटनांनी उपोषणामध्ये सहभागी होवून पाठींबा दिला.

 

 महापुरुषांना अभिवादन व कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेची आरती करून जोरदार घोषणाबाजी करत लाक्षणीक उपोषण सुरू केले. तर राष्ट्रगीताने उपोषणाची सांगता करण्यात आली.

 

अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जगताप, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,  उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, माजी जि. प. अध्यक्ष नेताजी पाटीलमाजी नगराध्यक्ष सुनील काकडे, राजसिंह राजे निंबाळकरआनंद कंदलेभिवा इंगोले, खंडू राऊत, शिवशंकर चौधरी, एडवोकेट दयानंद बिराजदार, जावेदभाई बागवान, प्राध्यापक अशफाक सर, अमोल जाधव, इंद्रजीत साळुंके, अनिल काळे, नागू मसुरे, माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे, नगरसेवक औदुंबर कदम, शांताराम केंदे, राजकुमार पाटील, प्राध्यापक रामलिंग थोरात, गजानन बोडके, सतीश खोपडे, हेमंत कांबळे, सुनील आवटी, नंदकुमार गवारे, प्रभाकर मुळे, संजय शितोळे, माजी उपसभापती  दत्तात्रय शिंदे, दत्ता राजमाने, विजय शिंगाडे, संतोष बोबडे, भुजंगराव पाटील, अनिल काळेआदी वक्त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

 

मराठा आरक्षण उपोषण आंदोलनाला नगराध्यक्ष सचिन रोचकरीविनोद गंगणेमाजी जि.प. सभापती अभय चालुक्य उपनगराध्यक्ष अभय इंगळेअविनाश गंगणेरामहरी शिंदेसंजय पाटीलदेवकन्या गाडे, धनंजय वाघमारेविद्या माने,माजी प.स सभापती बालाजी गावडे, राजाराम कोळगे, ओम नाईकवाडी यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top