जुगार विरोधी कारवाई.
भूम पोलीस ठाणे : झगडे गल्ली, भुम येथील राजु श्रीकांत खामकर हे दि. 31.01.2022 रोजी 15.30 वा. सु. राहत्या परिसरात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्यासह 810 ₹ रक्कम बाळगलेले असतांना भूम पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुने पोलीसांनी त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“अवैध मद्य विरोधी कारवाई.”
तुळजापूर पोलीस ठाणे : आपसिंगा, ता. तुळजापूर येथील ग्रामस्थ- एकनाथ हरिशचंद्र तोडकरी हे दि. 31.01.2022 रोजी 20.30 वा. सु. गावातील एका हॉटेलच्या बाजूस 180 मि.ली. च्या विदेशी दारुच्या 25 बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.