google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 आर पी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये GPAT परीक्षेचा ऑनलाइन वेबिनार संपन्न

आर पी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये GPAT परीक्षेचा ऑनलाइन वेबिनार संपन्न

0






उस्मानाबाद :- डॉ. वेद प्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपाटी उस्मानाबाद, येथील आर. पी. औषधनिर्माण-शास्त्र महाविद्यालयामध्ये डॉ.प्रतापसिंह जी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली "आजादी का अमृत महोत्सव" साजरा करत असताना, राष्ट्रीय स्तरावरील GPAT परीक्षा संदर्भात मार्गदर्शनासाठी ऑनलाइन वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनार प्रास्ताविक करताना  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी यांनी GPAT परीक्षेचे महत्त्व विशद केले. या वेबिनार साठी फार्मास्टार अकॅडमी नांदेड, चे डायरेक्टर विजयकुमार चकोते यांचे मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शन करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना GPAT परीक्षेचे महत्व व त्याची तयारी कशी करावी व तसेच कुठल्या विषयावरती जास्त भर द्यावा या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. या वेबिनार साठी कॉर्डिनेटर म्हणून प्रा. निशीनंदन शिंदे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक इम्रान मोमीन यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक  प्राध्यापक इतर कर्मचारी व बी. फार्मसी चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top