शेतकर्यांच्या बाबतीत केंद्र सरकार अजिबात गंभीर नसल्याचे दिसुन येत आहे. गेल्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली दीडपट हमीभाव ही घोषणा म्हणजे शेतकऱ्यांना दिलेले गाजर होते हे सिध्द झाले आहे.या अर्थसंकल्पात यावर एक चकार शब्द देखील अर्थमंत्र्यांनी काढला नाही. यावरुनच तुम्ही शेतकर्यांच्याप्रती किती गंभीर आहात हे लक्षात येत आहे. महागाई वाढलेली असताना त्यात दिलासा देण्याची आशा सामान्याना होती पण तिथेही भ्रमनिरास केल्याने हे सरकार फक्त घोषणा करते प्रत्यक्षात त्याच पुढे काहीच होत नाही. फसव्या घोषणा हेच या सरकारच मोठं यश आहे.
अशी प्रतिक्रिया ( Osmanabad MLA Kailas Patil )
उस्मानाबाद कळंब आमदार कैलास घाडगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे