शिक्षक एस एम शेख यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावना जपत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

0
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील हिप्‍परगा रवा येथील जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक एस.एम.शेख यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक भावना जपत 220 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करुन वाढदिवस साजरा करण्‍यात आला. यावेळी  शालेय व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष अनिल अतनुरे, मुख्‍याध्‍यापिका श्रीमती यु.एन.कांबळे, शिक्षक सुधीर घोडके, जी.के.जाधव, एन.एस.बंगले, एस.बी.परिट, श्रीमती एस.के.राठोड, श्रीमती एस.बी. बिडवे, आशपाक शेख, यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या स्‍तुत्‍य उपक्रमाचे  सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top