उस्मानाबाद,दि.01(जिमाका):-राज्
अनिवासी क्रीडा प्रबोधिनीस मान्यता देण्यास, विहीत अटी आणि सोयी सुविधा असणा-या सक्षम अशा नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना अनिवासी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.जिल्हयातील सक्षम खाजगी क्रीडा संस्था,क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त अनिवासी क्रीडा प्रबोधिनी सुरु झाल्यास अधिक गुणवंत खेळाडू निर्माण होवू शकतील.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हयातील आर्थिक सक्षम,सर्व क्रीडा सुविधा उपलब्ध असलेल्या क्रीडा क्षेत्रामध्ये विविध उपक्रम राबविणा-या तसेच प्राविण्य प्राप्त खेळाडू घडविणा-या खाजगी क्रीडा संस्था आणि क्रीडा मंडळे यांनी माहिती एकत्रित करून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत, अधिक माहितीसाठी कैलास लटके, क्रीडा अधिकारी 8329571660 यांच्याशी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सारिका काळे यांनी केले आहे.