google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 अवैध सावकारीस कंटाळून एकाची आत्महत्या

अवैध सावकारीस कंटाळून एकाची आत्महत्या

0


तामलवाडी पोलीस ठाणे : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव ग्रामस्थ- विठ्ठल हणुमंत वायकर, वय 28 वर्षे यांनी तुळजापूर येथील शशी कदम यांच्याकडून कर्जाउ स्वरुपात एक वर्षापुर्वी दोन लाख रक्कम घेतली होती. त्या रकमेचे व्याज मागील चार महिन्यांपासून विठ्ठल वायकर हे देत नसल्याच्या कारणावरुन शशी कदम यांसह त्यांचे आई- वडील अशा तीघांनी विठ्ठल यांच्याकडे तगादा लावला होता. यातूनच दि. 29.01.2022 रोजी नमूद कदम कुटूंबीयांनी विठ्ठल यांना पैसे न दिल्यास तुळजापूरात नेउन धींड काढण्याची धमकी फोनद्वारे देउन व विठ्ठल यांच्या घरी जाउन त्यांच्या कुटूंबीयांस धमकावले होते. या त्रासास कंटाळून विठ्ठल वायकर यांनी दि. 29- 30.01.2022 दरम्यान विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या विठ्ठल यांची आई- कुसुम हणुमंत वायकर यांनी दि. 02.02.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 504, 506, 34 सह महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम- 39, 45 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. 

अशी माहिती आज दिनांक 3 फेब्रुवारी रोजी उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलाच्या वतीने देण्यात आली आहे

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top