तामलवाडी:- दि.28फेब्रुवारी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तामलवाडी तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद येथे प्रकाशातील सात रंगाचा शोध लावणारे थोर शास्त्रज्ञ सी व्ही रमण यांचा जन्मदिन राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुभाष जाधव, पर्यवेक्षक गणेश हलकरे, यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत साळुंखे यांनी विज्ञान चे महत्व व विज्ञान कथा सांगून तसेच विज्ञान शिक्षक लक्ष्मण पाटील यांनी प्रकाशाचे अपस्करणचा शोध लावणारे डॉ सी वी रमन यांच्या विषयी सविस्तर माहिती सांगितली विज्ञान व मराठी विषय शिक्षकांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक औदुंबर माडजे, चंद्रकांत साळुंखे , चांगदेव सावळे प्रभाकर जाधव ,शिवकुमार सिताफळे, लक्ष्मण पाटील ,सुहास वडणे ,महादेव माळी, गिरीश जाधव ,योगेश राऊत ,महादेव मसुते, बालाजी साठे ,विनोद कुंभार प्रशांत चुंगे ,श्री गणेश स्वामी ,बालाजी रणसुरे ,महिला शिक्षिका शहीदा पिरजादे ,मनीषा गिरे ,विठाबाई पाटील ,मनीषा सावंत यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी साठे यांनी तर श्रीमती मनीषा सावंत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा
फेब्रुवारी २८, २०२२
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा