जागतिक महिला दिनाचे औचित्‍य साधुन महिला सबलिकरण व विविध विषयावर मार्गदर्शन

0

Osmanabad news :- 
लोहारा/प्रतिनिधी

लोहारा नगरपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्‍य साधुन महिला सबलिकरण व विविध विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन शहरातील भानुदासराव चव्‍हाण वरिष्‍ठ माहाविदयालयात  दि.8 मार्च 2022 रोजी शहरातील सामाजिक, प्रशासकिय, वैदयकिय, व्‍यावसाईक क्षेत्रात गौरवास्‍पद कार्य करणा-या ३० महिलांचा सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.उषाताई रविंद्र गायकवाड होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ.ज्योतीताई ज्ञानराज चौगुले, सायराबानु रजाक अत्तार, प्रमुख वक्ते म्हणून युवती प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सक्षना सलगर, शिवसेना युवा नेत्या आकांक्षा ज्ञानराज चौगुले, उपसंपादक दै.एकमत शाहेदा पटवारी, तर प्रमुख म्हणून महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्षा शरीफा सय्यद, नगराध्यक्ष वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, मुख्याधिकारी गजानन शिंदे, महिला व बालकल्याण सभापती शमाबी आयुब शेख, शिवसेना गटनेत्या सारीका प्रमोद बंगले, सार्व. आरोग्य व दिवाबत्ती सभापती सुमन दिपक रोडगे, पाणीपुरवठा व ललनिरसन समिती सभापती मयुरी अमोल बिराजदार, नगरसेविका शामल बळीराम माळी, कमल राम भरारे, आरती ओम कोरे, आरती सतिश गिरी, संगिता किशोर पाटील, अदि उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार एस.बी.हंकारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल मगर, प्राचार्या उर्मिला जावळे पाटील, डॉ.डी. डी.शिंदे, एस.बी.कदम, डॉ.प्रा.महानंदा मोरे, डॉ.प्रा‌. छाया कडेकर, वंदना भगत, शकिला पटेल गवंडी, अॅड.संद्याराणी तिगाडे, संचालिका सविता शहाजी जाधव, वर्षा चौधरी, राधा माळी, पुजा घोडके, आदिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन सन्मानित करण्यात आले. यावेळी सक्षना सलगर, आकांक्षा चौगुले, शाहेदा पटवारी, अदिंनी महिला दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी गजानन शिंदे व सुत्रसंचालन गटनेत्या सारीका बंगले यांनी केले तर आभार नगराध्यक्षा वैशाली खराडे यांनी मानले, या कार्यक्रमास अभिमान खराडे, आयुब अब्दुल शेख, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक अविनाश माळी, प्रमोद बंगले, दिपक रोडगे, नगरसेवक अमिन सुंबेकर, ओम कोरे, माजी उपनगराध्यक्षा नाजमिन शेख, रोहन खराडे, सकलेन शेख, यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायतनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top