महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल अ‍ॅड.वसंतराव साळुंके यांचा सत्कार

0
Osmanabad news :- 

महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल अ‍ॅड.वसंतराव साळुंके यांचा सत्कार


उस्मानाबाद -
मराठवाड्याचे सुपुत्र अ‍ॅड.वसंतराव साळुंके यांची महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. उस्मानाबादकरांसाठी ही बहुमानाची बाब असल्याने विधिज्ञ क्षेत्रासह सर्वच स्तरातून अ‍ॅड. साळुंके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

उस्मानाबाद येथे अ‍ॅड. वसंतराव साळुंके आले असता महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेच्या वतने त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन अ‍ॅड. साळुंके यांचा सत्कार करुन सदिच्छा दिल्या. यावेळी अ‍ॅड.चित्राव गोरे, शिक्षक भालचंद्र कोकाटे यांच्यासह शिवसेनेचे शहरातील आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top