Osmanabad news :-
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या नोटीशीची भाजपा उस्मानाबादच्या वतीने होळी
Osmanabad :- भारतीय जनता पार्टी जिल्हयाच्या वतीने आ.राणाजगजितसिंह पाटील व आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या र्मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या सुचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक उस्मानाबाद येथे विरोधी पक्षनेते मा.देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील बदल्यामधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलीसांनी मा.देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली. याचा आम्ही तीव्र निषेध करत भारतीय जनता पार्टी संपुर्ण ताकतीने मा.देवेंद्र फडणवीस यांच्या पाटीशी उभी असेल. तसेच माविआ सरकारने दिलेल्या नोटीशीच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी वतीने या नोटीशीची होळी करण्यात आली. तसेच या निष्ठुर आणि निकामी आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या माविआ सरकारमध्ये देशद्रोहयांना साथ देणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा न घेता त्यांची पाठराखण केली जाते. मात्र त्यांचे घोटाळे उघडकीस आणणाऱ्या मा.देवेंद्र फडणवीस यांना लगेच फोन टॅपींग प्रकरणात नोटीस बजावली जाते. त्यामुळे हे सरकार न्यायप्रविष्ठ नसुन या सरकार मध्ये चोर सोडुन सन्याश्याला फाशी दिली जाते.
तसेच आगामी काळातही भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारी मविआ सरकारच्या विरोधात आंदोलन करत राहील आणि जनता सुध्दा या वसुली सरकारला पायउतर केल्या शिवाय राहणार नाही.
या आंदोलन प्रसंगी ॲड.खंडेराव चौरे,ॲड.नितीन भोसले, सुनिल काकडे, प्रदिप शिंदे, राहुल काकडे, अभय इंगळे,दाजीप्पा पवार, पांडूरंग लाटे, लक्ष्मण माने, गजानन नवालडे, अभिराम पाटील, प्रविण सिरसाठे, सुजित साळुंके, राज निकम, अमोलराजे निंबाळकर, प्रितम मुंडे, विनोद निंबाळकर, उदय देशमुख, संदिप इंगळे, अमोल पेठे, नामदेव नायकल, प्रसाद मुंडे, सुनिल पंगुडवाले, सागर दंडनाईक, ज्ञानेश्वर सुळ, किशोर पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.