google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 राष्ट्रवादी महिला काँग्रेस उस्मानाबाद च्या वतीने प्रतिभा आरोग्य शिबीर संपन्न

राष्ट्रवादी महिला काँग्रेस उस्मानाबाद च्या वतीने प्रतिभा आरोग्य शिबीर संपन्न

0
राष्ट्रवादी महिला काँग्रेस उस्मानाबाद च्या वतीने प्रतिभा आरोग्य शिबीर संपन्न 

Osmanabad news :- 

Osmanabad :- 
आज दि 26/3/22 रोजी जिल्हा स्त्री रूग्णालय, उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सौ मनिषा पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार प्रतिभा आरोग्य शिबीर संपन्न झाले.

कार्यक्रमासाठी स्त्री रूग्णालय च्या अधिक्षक डाॅ स्मिता गवळी,डाॅ बाराते मॅडम,भंडारे सिस्टर, भाटे मॅडम, जिल्हा उपाध्यक्ष सौ किरणताई निंबाळकर, सौ संगिता काळे( जिल्हा सरचिटणीस), सौ मनिषा केंद्रे ( जिल्हा सरचिटणीस),सौ मंजुषा खळदकर, सौ मिनाक्षी जाधव, भाग्यश्री तनमोर,संगिता कोळगे, कविता पौळ उपस्थित होत्या. 

कारक्रमाचे उद्घाटन डाॅ स्मिता गवळी यांनी केले .प्रास्ताविक करताना मनिषा पाटील म्हणाल्या की, आजचे शिबीर माझ्या मधल्या मी साठी आहे, पुर्ण वेळ कुटूबासाठी महिला राबत असताना स्वत च्या आरोग्यकडे लक्ष देत तर नाहीच पण संतुलित आहार पण घेणे गरजेचे असताना रात्रीचे शिळे जेवण खाऊन अनेक महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात, वर्षातून एकदा आपल्या सर्व  प्रकारच्या शारीरीक चाचणी करून घेणे गरजेचे आहे.


तसेच गवळी मॅडम यांनी हिमोग्लोबीन, पेशींची संख्या तसेच गरोदरपणात घ्यावयाच्या काळजी विषयी मार्गदर्शन केले व महिलांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे असुन लहान सहान आजारपण अंगावर काढु नये असा सल्ला दिला.संगिता काळे यांनीही उपस्थित महिलांना आजाराबाबत मार्गदर्शन केले.
आरोग्य शिबीरात पिशवीच्या कॅन्सर ची तपासणी, तसेच हिमोग्लोबीन तपासणी खचून line list संग्रहीत केली, तसेच तंबाखु सेवन करणार्या महिलांची यादी करून घेतली आणि उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची तपासणी करून औषधे वाटप करण्यात आली.

शिबिरासाठी मराठे सिस्टर, साळुंखे सिस्टर, चव्हाण सिस्टर, इंगळे सिस्टर आणि खुने सिस्टर यांनी विशेष परिश्रम घेतले.

छाया राहुल कोरे आळणीकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top