सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा उद्या रविवारी उस्मानाबाद दौरा
Osmanabad news :-
उस्मानाबाद,दि.26():- सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उद्या दि.27 मार्च 2022 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दुपारी 02.30 वाजता लातूर येथून मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण.दुपारी 03.30 वाजता तुळजापूर ( tuljapur ) येथे आगमन व दर्शनासाठी राखीव.सायंकाळी 04.30 वाजता तुळजापूर येथून मोटारीने उमरगा जि. उस्मानाबादकडे प्रयाण.सायंकाळी 05.30 वाजता उमरगा जि.उस्मानाबाद येथे आगमन.सायंकाळी 05.30 वाजता भारत शिक्षण संस्था,उमरगा व श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा,ता.उमरगा जि.उस्मानाबाद तर्फे आयोजित विविध समारंभास उपस्थिती.(स्थळ: श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालय,उमरगा जि.उस्मानाबाद) रात्री 08.30 वाजता उमरगा येथून मोटारीने नांदेडकडे प्रयाण.