रुपामाता नॅचरल कडून १ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
अतिरिक्त उसाचा प्रश्न तातडीने सोडवणार - ॲड.गुंड
उस्मानाबाद (प्रतिनिधी) जिल्ह्यातील अतिरिक्त उसाचा प्रश्न सामाता नॅचरल शुगर सोडविण्यास प्राधान्य देईल असे मत ॲड. व्यंकटराव गुंड यांनी व्यक्त केले. एक लाख मॅट्रिक टन उसाचे गाळप झाल्यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
रुपामाता नॅचरल शुगर्स युनिट क्रमांक १ ने चालू हंगामात केलेले १ मेट्रिक टन उसाचे गाळप, तसेच ५ लाख ५ हजार ११ व्या पोत्याचे पूजन हा सुवर्ण योग पाडोळी येथे जुळून आला.
पाडोळी येथील रुपामाता नॅचरल शुगर्सच्या युनिट क्रमांक १( रुपामाता ऍग्रोटेक) येथे शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास पंजाब नॅशनल बँकेचे कोल्हापूर विभागाचे मुख्य व्यवस्थापक बलराम जाधव व कोल्हापूर शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक सुहास पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुपामाता उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.श्री व्यंकटराव गुंड पाडोळीकर होते.
आपल्या भाषणात कार्यक्रमाचे अध्यक्ष रुपामाता परिवाराचे प्रमुख व्यंकटराव गुंड यांनी, चालू हंगामात १ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केल्याबद्दल सर्व शेतकरी, कारखान्याचा शेतकी स्टाफ, कामगार यांचे आभार मानले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण नेहमी कटिबद्ध आहोत, या हंगामात अधिकाधीक उसाचे गाळप करून, सध्या परिसरातील तसेच जिल्ह्यात असलेला अतिरिक्त उसाचा प्रश्न तातडीने सोडवू असे त्यांनी सांगितले. लवकरच रोशनपुरी येथील रुपामाता पावर कारखान्याचा चाचणी हंगाम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती गुंड यांनी दिली.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पोत्याचे पूजन करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना जाधव यांनी रुपामाता उद्योग समूहाचे आभार मानले. व्यंकटराव गुंड यांनी ग्रामीण भागात आपल्या स्वतःच्या बळावर उद्योग उभा करून त्यास पुढे नेले आहे, अल्पावधीत रुपामाता समूहाने घेतलेली गरुडझेप निश्चित कौतुकास्पद आहे. बँक गुंड यांच्या प्रयत्नांना कायम साथ देईल, तसेच रुपामाता उद्योग समूहाने यापेक्षा जास्त प्रगती करावी असे मत जाधव यांनी यावेळी व्यक्त केले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड, पाडोळी येथील प्रगतिशील शेतकरी शाहूराज गुंड, हरिदास गुंड, रुपामाता ग्रुपचे MD अॅड अजितकुमार गुंड पाटील, प्रसिद्ध विधिज्ञ अॅड.शरद गुंड, कारखान्याचे जनरल मॅनेजर गरड ,चीफ इंजिनिअर शिलवंत, मुख्य सुरक्षा अधिकारी थोडसरे ,कृषि अधिकारी कारभारी, सिव्हिल इंजिनिअर पठाण, उपस्थित होते. याप्रसंगी परिसरातील शेतकरी, नागरिक व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गरड यांनी केले.