उस्मानाबाद जिल्हयातील वाळू लिलावास मुदतवाढ

0


Osmanabad news :- 

उस्मानाबाद,दि.08 ):- उस्मानाबाद जिल्हयातील, वाळू लिलाव 2021-2022 साठी जिल्हयातील रेती, वाळुघाटाची दुसऱ्या फेरीबाबत अधिसूचना 25फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. जिल्हास्तरीय वाळुघाट (मो.तांदुळदाडी, देऊळगाव, जगदाळवाडी, शेळगाव व वाटेफळ/इनगोंदा/हिंगणगाव.बु) लिलावाच्या दुसऱ्या फेरीस मुदतवाढ देण्यात आली आहे.

         या ई-निविदाबाबत https://mahatenders.gov.in आणि ई-लिलाव बाबत https://eauction.gov.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. तसेच वाळूलिलावाच्या अटी व शर्ती तसेच इतर माहिती Www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. या कार्यालयाचे दिनांक 25फेब्रुवारीच्या अधिसुचनेतील सर्व अटी व शर्ती निविदाधारकास आणि लिलावधारकास बंधनकारक राहतील, असे अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top