उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयाबाबत सोमवारी मुंबईत बैठकीचे आयोजन

0

Osmanabad news :- 

        उस्मानाबाद,दि.05(जिमाका):-येथील वैद्यकीय महाविद्यालयाबाबत चर्चा करण्यासाठी  राज्याचे पर्यटन,,पर्यावरण व वातावरणीय बदल,राजशिष्टाचार मंत्री अदित्य ठाकरे यांच्या रायगड या शासकीय निवासस्थानी सोमवार दि.7 मार्ज रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

    या बैठकीस वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि इतर सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.गेल्या वर्षी मार्च महिन्यात राज्य मंत्रिमंडाळाने उस्मानाबाद येथे 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 500 खाटांच्या रुग्णालयास मंजुरी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top