महापुरुषांच्या नावाने असलेल्या चौकांची स्वच्छता करून जिल्हा उस्मानाबाद युवा मोर्चाच्या वतीने शहिदांना अभिवादन

0

महापुरुषांच्या नावाने असलेल्या चौकांची स्वच्छता करून जिल्हा उस्मानाबाद युवा मोर्चाच्या वतीने शहिदांना अभिवादन

उस्मानाबाद :- 23 मार्च शहिद दिनाच्या निमित्ताने भारतमातेचे वीर सपुत्र शहीद भगतासिंग ,राजगुरू ,सुखदेव यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
 
आज या अनुषंगाने भाजपा प्रतिष्ठान भवन उस्मानाबाद येथे युवा मोर्चाच्या वतीने शहीद क्रांतिकारकांच्या प्रतीमांचे पुजन करण्यात आले यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष , युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर ,भाजप जिल्हाउपाध्यक्ष सुनील काकडे यांनी प्रतिमेचे पूजन केले यावेळी सर्व उपस्थित युवामोर्चा कार्यकर्त्यांनी ,पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचा संकल्प करून शहिद दिन निमित्ताने देशसेवेचे वृत दृढ केले आहे . त्याच बरोबर आपले शहर आपला परिसर स्वच्छ व सुंदर व्हावे ही जनजृतीही या‍निमित्ताने केली. यावेळी सर्व उस्मानाबाद शहर व ग्रामीण युवा मोर्चा पदाधिकारी ,कार्यकर्ते यांनी राजमाता  जिजाऊ चौक,संत गाडगेबाबा चौक,अण्णाभाऊ साठे चौक ,क्रांती स्तंभ परिसर ची स्वछता करून पूजन करुण अभिवादन केले ,त्याचबरोबर परिसरातील नागरिकांना ,व्यावसायिकांना स्वच्छतेचे महत्व सांगणारी जनजागृती यावेळी करण्यात आली.
 
या कार्यक्रमाचे आयोजन उस्मानाबाद जिल्हा  भारतीय जनतायुवा मोर्चा नी केले ,यावेळी माजी सभापती नाना कदम ,शहराध्यक्ष राहुल काकडे ,शेषेराव उंबरे ,देवा नायकल  ,बालाजी जाधव ,संदीप इंगळे ,प्रवीण शिरसाठ ,शहराध्यक्ष सुजित साळुंके ,तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी ,दाजीआपा पवार ,सलमान शेख ,सरचिटणीस कुलदीप भोसले ,जिल्हा सचिव प्रीतम मुंडे ,गणेश एडके ,रोहित देशमुख ,गणेश मोरे ,प्रसाद मुंडे ,जगदीश जोशी ,संतोष क्षीरसागर ,हिम्मत भोसले ,विशाल वाघमारे ,मेसा जानराव ,धनराज नवले ,किरण नायकल ,बबलू शेख ,सुनील पंगुडवाले ,अर्जुन उंबरे ,ज्ञानेश्वर सूळ ,सागर दंडनाईक ,आकाश कानडे ,ज्ञानेश्वर शिंदे ,राम सुरवसे इत्यादी सह धाराशिव शहर व ग्रामीण युवा मोर्चा पदाधिकारी ,कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top