Osmanabad news :-
तुळजापूरात ४०० कोंबड्या व ३ मोटारसायकल ची चोरी गुन्हे दाखल
तुळजापूर पोलीस ठाणे : मंगरुळ, ता. तुळजापूर येथील विजय पंडीत डोंगरे यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एई 4153 तसेच प्रसाद कमलाकर पाटील व रमेश नागनाथ डोंगरे यांच्या अनुक्रमे स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 वाय 9136 , होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्स 1932 अशा तीन मोटारसायकल दि. 03- 04.03.2022 रोजी दरम्यानच्या रात्री त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या विजय डोंगरे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे हद्दीत हडको, तुळजापूर येथील नरेश बाबुराव पेंदे यांच्या बोरी गट क्र. 13 मधील कुकूटपालन शेडची जाळी दि. 03- 04.03.2022 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने कापून शेडमधील एकुण 400 कोंबड्या चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या नरेश पेंदे यांनी दि. 04.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.