“रस्ता अपघात.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : नंदगुल तांडा, ता. तुळजापूर येथील अर्जुन गोविंद राठोड, वय 19 वर्षे हा दि. 04.03.2022 रोजी 09.30 वा. सु. नळदुर्ग शिवारातील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 25 जे 6190 ही चालवत जात होता. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. आर.जे. 32 जेसी 0545 हा चुकीच्या दिशेने निष्काळजीपने चालवल्याने अर्जुन चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला समोरुन धडकला. या अपघातात अर्जुन राठोड हा गंभीर जखमी होउन मयत झाला. या अपघातानंतर नमूद ट्रकचा अज्ञात चालक अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचे पिता- गोविंद लोकु राठोड यांनी दि. 05.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184, 134 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“मारहान.”
उस्मानाबाद (ग्रा.) पोलीस ठाणे : बेगडा, ता. उस्मानाबाद येथील शिवलींग बापु गिराम यांनी दि. 04.03.2022 रोजी 15.00 वा. सु. आपल्या घरासमोरी रस्त्यावर ज्वारी धान्य वाळत घातले होते. या कारणावरुन शेजारी- ज्ञानेश्वर लक्ष्मण सुतार यांनी शिवलींग गिराम यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान केल्याने शिवलींग गिराम यांच्या रक्ताच्या उलट्या झाल्या. अशा मजकुराच्या शिवलींग गिराम यांनी दि. 05.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे : तेरखेडा, ता. वाशी येथील जयदेवी माळी, कांता सदवदे, दिक्षा सदवदे, तानाबाई सदवदे, कुणाल साळवे, जितेंद्र सदवदे, संकेत सरवदे, स्वप्नील सरवदे, प्रीती सरवदे या सर्वांनी दि. 03.03.2022 रोजी 15.00 वा. सु. ग्रामस्थ- ध्नश्री राजेंद्र मगर यांच्या घरात घुसून नळजोडणी च्या नळास पाणी भरण्याच्या कारणावरुन धनश्री यांसह त्यांच्या आईस शिवीगाळ गरुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच जयदेवी माळी यांनी धनश्री व त्यांच्या आईच्या हातावर गळ्यावर चाकूने वार करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या धनश्री मगर यांनी दि. 05.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 452, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.