महिलांनी स्वतःचा सन्मान व आरोग्य याविषयी सजग राहावे - पोलीस अधीक्षक निवा जैन

0

Osmanabad news :-

जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

उस्मानाबाद येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती निवा जैन यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक जैन म्हणाल्या की, महिला या कुटुंबाचा कणा असतात त्यामुळे महिलांनी कुटुंबातील इतर व्यक्तीप्रमाणे स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. महिलांनी स्वतःचा सन्मान व आरोग्याबाबत जागरूक राहावे.
महिला दिनानिमित्त आरोग्य शिबीर आयोजित करणे हा खूप चांगला उपक्रम आहे. हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवावा अशी अपेक्षाही श्रीमती जैन यांनी व्यक्त केली.

शिबिरामध्ये 170 महिलांची आरोग्य तपासणी (नेत्र तपासणी, रक्त तपासणी) करण्यात आली.
याप्रसंगी जनता बँकेचे संचालक आशिष मोदानी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, काँग्रेस विधी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष विश्वजित शिंदे, पत्रकार धनंजय पाटील, युवक काँग्रेसचे विधानसभा सरचिटणीस स्वप्नील शिंगाडे, अभिजित देडे उपस्थित होते. शिबिरासाठी डॉ.श्रीपाद बलवंडे, डॉ.अश्विनी बलवंडे, कैलास अडसुळे, अक्षय माने यांनी सहकार्य केले.


शिबिराच्या यशस्वीतेसाठी नवनाथ डांगे, धनंजय मालखरे, सारंग वडगावकर, शिवाजी चव्हाण, धनंजय मुंडे, प्रवीण मालखरे, दत्ता मुंडे, गणेश शिंदे, ऋषिकेश मुंडे यांनी प्रयत्न केले.
सूत्रसंचालन विश्वजित शिंदे यांनी केले तर आभार प्रवीण मालखरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top