मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम 2022-23 अंतर्गत कर्ज प्रस्ताव दाखल करण्याबाबत आवाहन
Osmanabad news :-
उस्मानाबाद,दि.22(जिमाका): येथील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांना उत्पादन उद्योग आणि सेवा उद्योगासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना गत तीन वर्षापासून राज्यात राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत सेवा उद्योगासाठी दहा लाख मर्यादेपर्यंत आणि उत्पादन उद्योगासाठी 50 लाख रुपये मर्यादेपर्यंत बँकेतर्फे आर्थिक सहाय्य देण्यात येते-बँकेच्या कर्ज मंजुरीनंतर जास्तीत जास्त 35 टक्यापर्यंत जात प्रवर्ग तसेच उद्योग कार्यक्षेत्रनुसार अनुदान देय आहे.
आर्थिक वर्ष 2022-23 साठी उस्मानाबाद जिल्हयास 650 कर्ज प्रकरणाचे उदिष्ट देण्यात आले आहे.तेव्हा इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर maha-cmegp.gov.in या सकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करावेत. अर्ज करताना पासपोर्ट साईज फोटो,आधार कार्ड,पॅन कार्ड, सोबत जन्माचा दाखला,रहिवाशी प्रमाणपत्र शाळा, सोडल्याचा दाखला,शाळेचा निर्गम उतारा यापैकी एक तसेच एक मार्कशीट, व्यवसायाचा प्रकल्प अहवाल,जातीचे प्रमाणपत्र,ग्रामीण भागाकरिता लोकसंख्या प्रमाणपत्र आणि विहीत नमून्यातील हमीपत्र जोडणे आवश्यक आहे.
इच्छुक उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी तात्काळ संकेतस्थळाला भेट द्यावी आणि आपले परिपूर्ण अर्ज दाखल करावेत,असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.


