google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 राज्यातील २६९ नगरपरिषद नगरपंचायतचे कर्मचारी १ मेपासून बेमुदत काम बंद करणार -- संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख अभिजित गोरे

राज्यातील २६९ नगरपरिषद नगरपंचायतचे कर्मचारी १ मेपासून बेमुदत काम बंद करणार -- संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख अभिजित गोरे

0
राज्यातील 269 नगरपरिषद नगरपंचायतचे कर्मचारी 1 मेपासून बेमुदत काम बंद करणार -- संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख अभिजित गोरे 

लोहारा :- 
नगरपरिषद नगरपंचायत मधील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटना यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, माननीय नगर विकास मंत्री, माननीय नगर विकास सचिव, माननीय आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन मुंबई यांना संघटनेने निवेदन दिले आहे. यामध्ये विविध मागण्यांच्या साठी निवेदन सादर करण्यात आलेली आहे. यामध्ये राज्यातील नगरपरिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन कोषागारातुन व्हावे, नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन सरसगट व्हावे, सफाई कर्मचाऱ्यांची पदे वाढवून ठेकेदारी पद्धत बंद करण्यात यावी, नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून देऊन वेतनश्रेणी मध्ये वाढ करण्यात यावी, राज्यसेवा संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी एकसमान करण्यात यावी यामध्ये स्वच्छता निरीक्षक, कर व प्रशासकिय सेवा, अग्निषमन सेवा यांची वेतनश्रेणी 2800 वरुन 4200 करणेत यावी. संवर्गातील कर्मचाऱ्यांची जेष्ठता यादी तात्काळ प्रसिद्ध करून ज्येष्ठतेनुसार रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ देण्यात याव्यात, मुख्य अधिकारी पदावर संवर्गातील कर्मचारी यांना पदोन्नतीच्या संधी देणेसाठी 10 %  ऐवजी 50 % अशी पदनिर्मिती करण्यात यावी, आणि अन्य मागण्यांसाठी संघटनेने तीन टप्प्यात आंदोलन पुकारलेले आहे. या मधील दुसरा टप्पा 20 एप्रिल 2022 रोजी आझाद मैदान ते मंत्रालय मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चामध्ये राज्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायतचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. तसेच मोर्चा पूर्ण झाल्यानंतर 1 मे 2022 कामगार दिन पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेले आहे. यामध्ये राज्यातील सर्वच अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद मध्ये सहभाग नोंदवणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटनेचे राज्य प्रसिद्धीप्रमुख अभिजित गोरे यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top