google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न

0

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न 

Osmanabad news :-

लोहारा/प्रतिनिधी
 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा येथे दिनांक 19 एप्रिल 2022 रोजी शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा वैशालीताई अभिमान खराडे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मधुकर रोडगे होतें. तर प्रमुख म्हणून उपनगराध्यक्ष आयुब शेख, गटशिक्षणाधिकारी भास्कर बेशकराव, केंद्र प्रमुख मोहन शेवाळे, पत्रकार बालाजी बिराजदार, इकबाल मुल्ला, गणेश खबोले, विशेष शिक्षक रविशंकर आगळे, अदि, उपस्थित होते. यावेळी सहा टेबलची मांडणी करण्यात आली. टेबल क्रमांक एक वर नाव नोंदणी वजन व उंची घेण्यात आले. टेबल क्रमांक दोन शारीरिक विकास यामध्ये दोरीच्या उड्या कागदाची होडी तयार करणे चित्रात रंग भरणे घेण्यात आले. टेबल क्रमांक तीन बौध्दिक विकास यामध्ये लहान मोठा फरक ओळखणे दिलेल्या वस्तू प्रमाणे लावणे जोडी लावणे घेण्यात आले. टेबल क्रमांक चार वर क्षमता यामध्ये आपल्या परिवारातील सदस्यांची नावे सांगणे स्वच्छ आणि नीटनेटकी राहणे खेळात सहभाग घेणे. टेबल क्रमांक पाच भाषा विकास यामध्ये चित्र पाहून वर्णन करणे गोष्ट सांगणे अक्षरी ओळखणे. टेबल क्रमांक सहा गणन पूर्वतयारी यामध्ये कमी-जास्त ओळखणे आकार ओळखणे अंक ओळखणे वस्तू मोजणे घेण्यात आले. यावेळी प्रतिनिधी स्वरूपात पालक म्हणून बालाजी बिराजदार व पूजा वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी गटशिक्षणाधिकारी भास्कर बेशकराव, मुख्याध्यापक मधुकर रोडगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ पांचाळ व सुत्रसंचालन सुरेश साळुंखे यांनी केले तर आभार डि.एस.क्षीरसगर यांनी मानले. या कार्यक्रमास विक्रांत संगशेटटी, शिक्षक सिद्राम जट्टे, सुरेश अंबुरे, मच्छिंद्र भुजबळ, दत्तात्रय फावडे, राजकुमार दीक्षित, प्रताप साळुंके, बालाजी यादव, प्रवीण शिंदे,  जहिरोद्दीन शेख, श्रीशैल जट्टे, संतोष माळवदकर, सावित्रा अकूलवार, महानंदा चव्हाण, वर्षा चौधरी, सचिन शिंदे, मनीषा भोजने, ज्योती पाटील, प्रमोद सरवदे, नेहा भंडारे, सोनम कांबळे, दयानंद क्षीरसागर, अतुल भड, यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top