खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध करुन द्याव्यात -जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
Osmanabad news :-
उस्मानाबाद.दि.20(जिमाका):- येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाच्या निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी जिल्ह्यात अनाधिकृत बियाण, रासायनिक खते, किटकनाशके यांची विक्री होत असल्यास संबंधितावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यामध्ये खरीप हंगामात सोयाबीन हे प्रमुख पिक आहे. मागील वर्षी 3 लाख 84 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झालेली होती. चालू वर्षी 3 लाख 94 हजार 600 हेक्टरवर सोयाबीनची पेरणी कृषी विभागाने प्रस्तावीत केली आहे. जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या नियोजनाच्या अनुषंगाने कृषी निविष्ठांच्या उपलब्धतेबाबत आणि त्याच्या सनियंत्रणाबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मा.पालकमंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा मार्केटींग अधिकारी, महाबीज प्रतिनिधी, एमआयडीसी प्रतिनिधी, कृषी विक्रेते प्रतिनिधी, खत पुरवठादार कंपनी प्रतिनिधी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक आदी उपस्थित होते.
जिल्ह्याचा मागील तीन वर्षांचा खतांचा सरासरी वापर 62 हजार 703 मे.टन आहे. कृषी विभागाने चालू वर्षाकरीता 96 हजार 200 मे.टनाची मागणी आयुक्तालय स्तरावर केलेली आहे. त्याअनुषंगाने 75 हजार 270 मे.टन आवंटन कृषी आयुक्तालयाकडून मंजूर करण्यात आलेले आहे. मंजूर आवंटनाप्रमाणे पुरवठा होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित कंपनी प्रतिनिधी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच 100 टक्के खत विक्री ही ई पॉस मशीनद्वारे करणे, कृषी निविष्ठा सनियंत्रणासाठी जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर भरारी पथक स्थापन करुन त्याद्वारे सर्व कृषी सेवा केंद्राची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक खत दुकानात किती आणि कोणते खत उपलब्ध आहे, याची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी http://osmanabadsao.blogspot.


