गुजरात सरकारविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी
उस्मानाबाद,दि.26 -
गुजरातच्या वडगाम मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवानी यांच्या अटकेच्या निषेधार्थ उस्मानाबाद येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज (दि.26) निदर्शने आंदोलन करुन गुजरात सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.आमदार मेेवानी यांची तात्काळ सुटका करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
आमदार जिग्नेश मेवानी यांना तीन दिवसांपूर्वी आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील विश्रामगृहातून रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे. पंतप्रधानांविषयी एक ट्विट केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेसच्या वतीने निदर्शने करुन गुजरात सरकार व भारतीय जनता पार्टीच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारी ही अटक असून आमदार मेवानी यांची तात्काळ सुटका करण्याची मागणी करत आंदोलकांनी अटकेच्या घटनेचा तीव्र निषेध केला. त्यानंतर जिल्हाधिकार्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.धीरज पाटील, मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, वरिष्ठ उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, सेवा दल अध्यक्ष विलास शाळू, मागासवर्गीय सेलचे सिद्धार्थ बनसोडे, जनरल सेक्रेटरी दादा पाटील, सरचिटणीस ॲड.जावेद काजी, सरचिटणीस हरिश्चंद्र शेळके, सरचिटणीस विनोद वीर, सरचिटणीस उमेश राजे,विधिज्ञ विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड.विश्वजित शिंदे, मानवाधिकार जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे, बाबा पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष गौरीशंकर मुळे ,शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष शहाजी मुंडे, प्रदेश सरचिटणीस धनंजय राऊत, माजी शहराध्यक्ष समीयोद्दीन मशायक, संचालक अयुब पठाण, सेवा दल अध्यक्ष अॅड.प्रणित डिकले,अशोक बनसोडे, अब्दुल लतीफ, तुकाराम पाटील, मेहराज शेख, सतीश इंगळगी, अरिफ भाई, अतिक काजी, कथले, अहेमद चाऊस यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.