google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 मनोज आव्हाड याच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या - सकल मातंग समाजाचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

मनोज आव्हाड याच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या - सकल मातंग समाजाचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
Osmanabad news :- 

मनोज आव्हाड याच्या मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा द्या , सकल मातंग समाजाचे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

उस्मानाबाद - ( खादिम सय्यद ) 
औरंगाबाद येथील मातंग समाजातील मनोज शेषेराव आव्हाड या तरुणाच्या मारेकर्‍यास फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज (दि.25) निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हाधिकार्‍यांमार्फत पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, मनोज आव्हाड या तरुणाला जय लहुजी म्हटल्याचा राग मनात धरुन चोरीचा आरोप लावून आठ-दहा जणांनी लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत मनोज याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हीडीओमध्ये दिसत असलेल्या आरोपींना अटक केली असली तरी मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. मातंग समाजावर होणार्‍या अन्यायाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे मुख्य आरोपीला अटक करुन सर्व मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. अन्यथा मातंग समाज रस्त्यावर उतरुन आंदोलन करील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

या वेळी निवेदन देताना सचिन लोंढे , मुकेश  देडे, रॉबिन भाऊ बगाडे, खंडू जाधव, अंकुश पेठे, सोमनाथ पेठे, महेश देडे, अजय चव्हाण, खंडू  चव्हाण, दत्ता पेठे गावसुद, व मातंग समाज उस्मानाबाद जिल्हा उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top