राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खत, पेट्रोल,डिझेल एलपीजी गॅस इंधन दरवाढ महागाई विरोधात आंदोलन

0
Osmanabad news :- 


उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वात खत, पेट्रोल,डिझेल एलपीजी गॅस इंधन दरवाढ महागाईविरोधात आंदोलन व जाहीर निषेध करण्यात आला.

दिनांक 07/04/2022 रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले यावेळी बैलगाडी थांबवून निदर्शने व निषेध करण्यात आले.  बिराजदार बोलत असताना "अच्छे दिन चे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार हे महागाई रोखण्यात अकार्यक्षम ठरले आहे"
खताच्या किमती भाव पाचशे ते सातशे रुपयांनी वाढले असून त्यात पोटॅश खताचे दर 1015 वरून 1700 रू तर D.A.P खताचे दर 12% ने वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले आहे.
 व मागील दोन वर्षात कोरोना महामारी मुळे अनेक उद्योगधंदे बंद होते यातून देश सावरत असताना देखील इंधनाची दरवाढी मुळे महागाई ही वाढत आहे याचे भान केंद्र सरकारला राहिलेले नाही आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असतानाही देखील जनतेला केंद्र सरकारने दिलासा दिलेला नाही अशी खंत सुरेश बिराजदार यांनी व्यक्त केली आहे.
या भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. दिनांक 07/04/2022 रोजी पेट्रोल डिझेल एलपीजी गॅसचे दर पेट्रोल 120.77 ,रू डिझेल 103.47 रू, एलपीजी गॅस 974.5 रू पर्यंत भाव पोहोचले आहेत. गेल्या १६ दिवसात १४ वी इंधन दरवाढ झाली आहे. यावरून उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. ही ‘प्रधानमंत्री जन धन कंगाल योजना’ असल्याचे वाक्य सुरेश बिराजदार यांनी केले आहे.  २०१४ मध्ये मोटारसायकल, कार, ट्रॅक्टर आणि ट्रकच्या पेट्रोल टाक्या भरण्याच्या सध्याच्या किमतीची तुलना करणारा आलेख त्यांनी आंदोलनात व्यक्त केला आहे. आकडेवारीत २०१४ मध्ये स्कूटर किंवा बाइकची टाकी भरण्यासाठी ७१४ रुपये खर्च येत होता. आता त्याची किंमत १,०३८ रुपये आहे. ३२४ रुपयांनी भाव वाढले आहेत. २०१४ मध्ये चारचाकी गाडीची टाकी २,८५६ रुपयांना भरायची, आता त्यासाठी ४,१५२ रुपये मोजावे लागतात. टाकीच्या किमतीतील फरक १,२९६ रुपये झाला आहे. ट्रॅक्टरची टाकी भरण्यासाठी पूर्वी २,७४९ रुपये खर्च येत होता, आता त्याची किंमत ४,५६३ रुपये आहे. म्हणजेच लोकांना १,८१४ रुपये अधिक मोजावे लागत आहेत. त्याच वेळी,२०१४ मध्ये ट्रकची टाकी भरण्यासाठी ११,४५६ रुपये खर्च येत होता, तो आता वाढून १९,०१४ रुपये झाला आहे. म्हणजेच ट्रकची टाकी भरण्यासाठी लोकांना ७,५५८ रुपये जास्त मोजावे लागतात.
१६ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. इंधनाच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. 
वाहतूक खर्च वाढल्यामुळे महागाईचा भडका वाढलेला आहे त्यामुळे सामान्य जनतेचे जीवनमान पूर्णत कोलमडून गेले आहे. त्यामुळे आता जगावे कसे असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. तरी या रक्तपिपासू केंद्र सरकारचा आम्ही राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे जाहीर निषेध करत आहोत.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर,माजी नगराध्यक्ष संपत डोके, अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष प्रदेश मसुद शेख,जिल्हा सरचिटणीस नितीन बागल ,प्रतापसिंह पाटील , उस्मानाबाद कळंब विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे,प्रभारी महिला जिल्हाध्यक्ष महिला मनीषा पाटील, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष श्याम घोगरे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब स्वामी, तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब जमदाडे,उस्मानाबाद तालुका अध्यक्ष सुरेखा जाधव, महिला अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष अप्सरा पठाण, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण,सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश एखंडे, उस्मानाबाद शहराध्यक्ष आयाज शेख,उस्मानाबाद तालुका अध्यक्ष श्याम घोगरे तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब जमदाडे, शेखर घोडके , रणवीर इंगळे, महेश नलावडे , आळणी सरपंच प्रमोद विर, वाहतूक नियंत्रण जिल्हाध्यक्ष विवेक घोगरे,मीनल काकडे ,राजकुमार पवार अन्वर शेख ,बिलाल तांबोळी, बाबा मुजावर,उस्मानाबाद शहर  युवक शहर कार्याध्यक्ष रॉबिन बागडे, दत्तात्रय पवार, प्रशांत फंड, तेजस भालेराव, नितीन चव्हाण, युवा नेते मृत्युंजय बनसोडे, शहर उपाध्यक्ष अनिकेत पाटील, अजय कोळी, आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छाया राहुल कोरे आळणीकर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top